Weather Update : शहरात दिवसभर उकाडा अन् सायंकाळी पाऊस धारा..

Weather Update : शहरात दिवसभर उकाडा अन् सायंकाळी पाऊस धारा..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात पावसाने सलग पाचव्या दिवशी जोरदार बॅटिंग केल्याने उन्हाळी हंगामात शहरात 108.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. यातील 70 मि.मी. पाऊस गत पाच दिवसांत झाला हे विशेष. शहरात दिवसा घामाच्या धारा, तर सायंकाळी पावसाच्या धारा बरसत असल्याचे चित्र आहे. गेले पाच दिवस शहरात दिवसा प्रचंड उकाडा अन् सायंकाळी 6 च्या सुमारास धो-धो पाऊस असा नित्यक्रम सुरू आहे.

मार्च ते एप्रिल या 60 दिवसांत शहरात एकही दिवस पाऊस झाला नाही. मात्र, मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. पहिल्या आठवड्यात अवकाळीला सुरुवात झाली. तेव्हा 20 ते 30 मि.मी. पावसाची नोंद झाली. 10 ते 13 मेपर्यंत जोरदार पाऊस झाला. त्यानंतर तीन दिवस उघडीप घेतली. तोवर शहरात 40 मि.मी. पावसाची नोंद झाली. 15 ते 19 मे या पाच दिवसांत दररोज सायंकाळी पाऊस पडतो. या पाच दिवसांत सरासरी 70 मि.मी. पाऊस झाला आहे.

मान्सूनपूर्व वार्‍याचा वेग हा ताशी 30 ते 40 कि.मी. आहे. मात्र सोमवारी शहरात 40 ते 50 कि.मी .इतक्या वेगात वारा वाहत होता. वानवडी भागात तर तो ताशी 70 कि.मी. इतका दिसून आला.

-अनुपम कश्यपी, निवृत्त हवामान विभागप्रमुख, पुणे

वानवडीत वार्‍याचा वेग 70 कि.मी. प्रतितास

मान्सूनपूर्व पावसाचा वेग हा ताशी सुमारे 30 ते 40 कि.मी. इतका असतो. मात्र तो यंदा 40 ते 50 कि.मी. आहे. वानवडी भागात तो ताशी 70 किलोमीटर इतका होता. त्यामुळे या भागात घरांवरील पत्रे उडणे, झाडपडीच्या घटना झाल्या.

कमाल-किमान तापमान…

शिवाजीनगर 38 (22.3), 39 (23.5), लोहगाव 39 (25.1), चिंचवड 40(25.7), लवळे 41(24.8), मगरपट्टा 40(24.8), एनडीए 39(22.5), कोरेगाव पार्क 41(23.9)

24 तासांतील पाऊस (मि.मी.)

  • शिवाजीनगर : 6.4
  • लोहगाव : 14.2
  • चिंचवड : 11.5
  • मगरपट्टा : 14
  • कोरेगाव
  • पार्क : 1.5

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news