बारावी परीक्षेचा आज निकाल

बारावी परीक्षेचा आज निकाल

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. 21) दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत चार दिवस अगोदरच राज्य मंडळाने निकाल जाहीर केला आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोल्हापूर, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा घेतली होती.

कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यांतून 1 लाख 19 हजार 633 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये 63 हजार 981 मुले, तर 55 हजार 652 मुलींचा समावेश आहे. तीन जिल्ह्यांत 175 परीक्षा केंद्रे होती.

काही दिवसांपूर्वी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर राज्य मंडळाचा निकाल कधी जाहीर होणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले होते. राज्य मंडळाने बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार मंगळवारी (21 मे) दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना mahresult.nic.inmahahsscboard.in, http///:hscresult. mkcl.org या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहिल्यानंतर निकालाची प्रिंटही घेता येणार आहे. त्याचप्रमाणे डिजीलॉकर अ‍ॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर बोर्डाचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news