आदमापूर येथील बाळूमामा देवालयाचे मानद अध्यक्ष, विश्वस्त दोषमुक्त | पुढारी

आदमापूर येथील बाळूमामा देवालयाचे मानद अध्यक्ष, विश्वस्त दोषमुक्त

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सद्गुरु श्री बाळूमामा देवालय आदमापूर (ता.भुदरगड) देवस्थानचे मानद अध्यक्ष व इतर विश्वस्त यांच्याविरूद्ध मा. धर्मादाय सह. आयुक्त कोल्हापूर यांच्या न्यायालयातील दाव्याचा निकाल आज (दि.26) दिला. यामध्ये मानद अध्यक्ष धैर्यशील शिवाजीराव भोसले व इतर विश्वस्त यांना दोष मुक्त करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत निरीक्षक रागिनी खडके या देवस्थानच्या कार्याध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. संपूर्ण कागदपत्राचा चार्जदेखील विश्वस्तांकडे देण्याचा निर्णय देण्यात आला आहे.

प्रवीण शामराव पाटील, रवींद्र पाटील, हनुमंत पाटील यांनी दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी बाळूमामा देवस्थानचे विश्वस्त मंडळ यांच्याविरूद्ध देवस्थानमध्ये गैरकारभार केल्याबाबत आरोप करत तक्रार केली होती. सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने कार्यालयाच्या अधीक्षक व निरीक्षक यांनी चौकशी करून अहवालात बाळूमामा देवालयाचे विश्वस्त दोषी असल्याचे नमूद केले होते.

सदर चौकशी अहवालावर धर्मादाय सहाय्यक आयुक्तांनी विश्वस्तांविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार धर्मादाय सह. आयुक्तांनी चौकशीचे प्रकरण प्रस्तावित केले होते. त्यामध्ये विश्वस्तांची विरोध चार्ज खारीज करून त्यांना दिनांक 24 /4/ 2023 रोजी बाळूमामा देवालयाच्या विश्वस्त पदावरून तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. आणि देवस्थानावर प्रशासक यांची नियुक्ती करण्यात आली.

तेव्हापासून देवस्थानचे व्यवस्थापन प्रशासक पहात होते. मुंबई हायकोर्टने प्रकरण दिनांक 30/ 4/ 2024 पूर्वी निकाल लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चौकशी अर्जाचे कामे उभय पक्षकारांचे जाब-जबाब व युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर धर्मादाय सह आयुक्त कोल्हापूर यांनी दि. 26 एप्रिल 2024 रोजी सदर प्रकरणी निकाल देऊन सदर देवस्थानचे मानद अध्यक्ष धैर्यशील शिवाजीराव भोसले व इतर विश्वस्त यांचे विरोध ठेवण्यात आलेला चार्ज खारीज करण्यात आला.

यामध्ये तात्पुरते निलंबन रद्द करण्यात आले होते. त्याचप्रमाणे निरीक्षक श्रीमती रागिनी खडके यांना देवस्थान मध्ये पुढील आदेशापर्यंत कार्याध्यक्ष म्हणून कामकाज पाहण्यासाठी नेमण्यात आले होते. प्रशासक यांनी कागदपत्रांचा चार्ज विश्वस्ता कडे देण्याबाबतचा आदेश केलेला आहे. सदर आदेशानुसार मानद अध्यक्ष धैर्यशील शिवाजीराव भोसले यांच्याविरूद्ध केलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले असून देवस्थानचे व्यवस्थापन हे त्यांनी योग्य प्रकारे काम करत आहे. या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे. मानद अध्यक्ष धैर्यशील शिवाजीराव भोसले यांच्या वतीने अँड. अमित बाडकर यांनी काम पाहिले. मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले त्यांच्यावर भ्रष्टाचारांचे कोणतेही आरोप नव्हते ज्याने भ्रष्टाचार केला आहे त्यांचं निलंबन करण्यात आले आहे

 

Back to top button