कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीचा खून | पुढारी

कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीचा खून

नूल ; पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून पतीने मानेवर विळ्याने वार करून पत्नीचा निर्घृण खून केला. सोमवारी (दि. २५) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नूल (ता. गडहिंग्लज) येथील हिटणी वसाहतीमध्ये ही घटना घडली.

संबंधित बातम्या 

सुशीला मारूती बेळाज (वय ५०) असे मृत महिलेचे नाव असून, संशयित पती मारुती शिवाप्पा बेळाज (वय ६०) हा फरार झाला आहे. गडहिंग्लज पोलिसांकडून घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे. तपासात मारुती याचा शोध घेतला जात आहे.

Back to top button