Raju Shetti : इंडिया आघाडीत गेलेलो नाही : राजू शेट्टी : इंडिया आघाडीत गेलेलो नाही : राजू शेट्टी | पुढारी

Raju Shetti : इंडिया आघाडीत गेलेलो नाही : राजू शेट्टी : इंडिया आघाडीत गेलेलो नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभेची निवडणूक आपण स्वतंत्रपणे लढणार आहोत. इंडिया आघाडीत आपण गेलो नसल्याचे स्पष्ट करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका अधोरेखीत केली आहे. (Raju Shetti)

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी निवडणूक लढवित आहेत. सुरुवातीपासून त्यांनी आपण महाविकास आघाडी व महायुतीपासून समान अंतरावर राहून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. महाविकास आघाडीला वाटत असेल तर त्यांनी आपल्याला बाहेरून पाठिंबा द्यावा, पण आपण आघाडीत सहभागी होणार नाही, अशी भूमिका मांडली होेती. मात्र, त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. ही जागा ठाकरे शिवसेनेच्या कोट्यात असल्याने शिवसेनेने पाठिंबा द्यावा, अशी त्यांची भूमिका होती, मात्र पाठिंबा हवा असेल तर आघाडीत आले पाहिजे, अशी भूमिका आघाडीच्या अन्य नेत्यांनी घेतली होती. (Raju Shetti)

त्यावर शेट्टी यांनी लोकसभेची निवडणूक आपण स्वतंत्र लढणार आहे. ज्यांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी द्यावा. आपल्याला इंडिया आघाडीत निमंत्रण देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यादव व खासदार अशोक चव्हाण हेच भाजपबरोबर गेल्यामुळे कुणावरही भरवसा राहिला नाही. त्यामुळे आपण इंडिया आघाडीत गेलो नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण निवडणूक लढविणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

Back to top button