निम्म्या कोल्हापुरात उद्यापासून दिवसाआड पाणी | पुढारी

निम्म्या कोल्हापुरात उद्यापासून दिवसाआड पाणी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : धरणातील पाणीसाठा व कळंबा तलावाची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. परिणामी, भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून निम्म्या कोल्हापुरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ए, बी, ई वॉर्ड अंशत: व सी, डी वॉर्ड तसेच संलग्नित उपनगरे आणि ग्रामीण भागातील बालिंगा उपसा योजनेवर अवलंबून असणार्‍या भागामध्ये बुधवार, दि. 28 पासून महापालिकेने दिवसाआड पाण्याचे नियोजन केले आहे.

बुधवारी (दि. 28) आझाद गल्ली, मटण मार्केट, लक्ष्मीपुरी परिसर, शाहूपुरी 5, 6, 7, व 8 वी गल्ली, कामगार चाळ, सुभाष रोड, चांदणी चौक, रविवार पेठ, सुतारवाडा, खानविलकर पेट्रोल पंप, अकबर मोहल्ला, साळी गल्ली, महाराणा प्रताप चौक,
शाहूपुरी कुंभार गल्ली, बाराईमाम परिसर, भवानी मंडप परिसर, सबजेल परिसर, मिरजकर तिकटी, महालक्ष्मीनगर, टेंबे रोड परिसर, सावित्रीबाई फुले दवाखाना परिसर या भागामध्ये पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

गुरुवार (दि. 29) महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, ब—ह्मेश्वर बाग, तटाकडील तालीम परिसर, चंद्रेश्वर, संध्यामठ, फुलेवाडी, रंकाळा टॉवर परिसर, शिवाजी पेठ काही भाग, गुजरी परिसर, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, गंगावेस, दुधाळी, पंचगंगा रोड, लोणार चौक, पापाची तिकटी, बुरुड गल्ली, सोन्या मारुती चौक, शिपुगडे तालीम, पिवळावाडा, डोर्ले कॉर्नर, सिद्धार्थनगर, ब—ह्मपुरी, उत्तरेश्वर परिसर, लक्षतीर्थ, बलराम कॉलनी या भागामध्ये पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पत्रकाद्वारे केले आहे.

Back to top button