शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह पाटील, उपाध्यक्षपदी राजसिंह शेळके | पुढारी

शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह पाटील, उपाध्यक्षपदी राजसिंह शेळके

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक प्रवीणसिंह पाटील यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे राजसिंह शेळके यांची निवड झाली. अध्यक्ष, उपाध्यक्षदाच्या निवडीसाठी आज (दि.५) संचालक मंडळाची सभा झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निळकंठ करे यांनी काम पाहिले. Shetkari Sangh

प्रवीणसिंह पाटील हे कागल तालुक्यातील मुरगूड येथील आहेत. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तर उपाध्यक्ष शेळके हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. अध्यक्ष- उपाध्यक्ष पदासाठी या दोघांची निवड एक- एक वर्षासाठी आहे. Shetkari Sangh

शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय आघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. निवडीच्या सभेस संचालक जी. डी. पाटील, दता राणे, अमरसिंह माने, अजित मोहिते, आनंदा बनकर, दत्ताजीराव वारके, अप्पासो चौगुले, सुभाष जामदार, विजयसिंह युवराज पाटील, सर्जेराव देसाई, बाबासाहेब शिंदे, प्रधान पाटील, जयकुमार मुनोळी, परशुराम कांबळे, सुनील मोदी, रोहिणी धनाजी पाटील, अपर्णा अमित पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button