आजऱ्यातील रवळनाथ मंदिराच्या बांधकामासाठी ५ कोटीचा निधी मंजूर : प्रकाश आबिटकर | पुढारी

आजऱ्यातील रवळनाथ मंदिराच्या बांधकामासाठी ५ कोटीचा निधी मंजूर : प्रकाश आबिटकर

आजरा; पुढारी वृत्तसेवा : आजरा शहरासह तालुक्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या ७०० वर्षापुर्वीच्या श्री रवळनाथ देवालयाच्या नूतन बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपकाव्दारे दिली आहे.

श्री रवळनाथ ग्रामदैवत हे साधारण ७०० वर्षापूर्वीचे असून आजरा शहराच्या मध्यवस्तीत वसलेले आहे. मंदिर पूर्वी लाकडी व दगडी स्वरूपाचे होते. मंदिरामध्ये मोठे तीन चौक टप्पे होते. या मंदिराचा १९८२ साली शहरातील नागरीकांनी जिर्णोध्दार केला. मंदिराच्या भोवताली अन्य मुख्य देवस्थाने असून भावेश्वरी, पालवेर, महादेव मंदिर, गणेश मंदिर आदी शेजारीच मंदिर आहेत. या देवस्थानच्या यात्रा व रथोत्सवाला लाखोंच्या संख्येने भक्त येत असतात.

श्री रवळनाथाची मुख्य यात्रा असते, त्यावेळी १० दिवस भरगच्च कार्यक्रम असतात. या मंदीरास अनेक वर्षे झाली असून मंदीराचा जिर्णोध्दार करून त्याची नव्याने बांधणी करण्याची मागणी नागरीकांकडून करण्यात येत होती. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून मंदिर दगडी बांधण्यासाठी नगरविकास विभागाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे आमदार अबिटकर यांनी नमूद केले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य लाभल्याचे पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button