‘हेरिटेज कोल्हापूर’ निबंध स्पर्धेला प्रतिसाद, निकाल जाहीर | पुढारी

‘हेरिटेज कोल्हापूर’ निबंध स्पर्धेला प्रतिसाद, निकाल जाहीर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जागतिक हेरिटेज सप्ताह निमित्त दै ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन, गोमटेश इंग्लिश मेडीयम स्कूल, निपाणी, यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा झाली. हेरिटेज कोल्हापूर या विषयातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक, सांस्कृतिक, कला – क्रिडा परंपरेचा वारसा लेखणीतून मांडला. स्पर्धेत मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातून स्पर्धेच्या अंतिम फेरीत शहर व तालुकानिहाय 13 जणांची निवड करण्यात आली असून प्रत्यक्ष मुलाखतीतून प्रथम तीन गुणानुक्रम देण्यात येणार आहेत.

स्पर्धेची अंतिम फेरी गुरूवारी (दि 25 ) सकाळी नऊ वाजल्यापासून उत्तरेश्वर पेठ येथील केएमसी कॉलेज येथे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.

prayog foundation kolhapur
prayog foundation kolhapur

तालुकानिहाय उत्कृष्ट निबंध –

मानसी अब्दागिरे – आण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातगणंगले, निशीगंधा पाटील-पार्वतीबाई मोरे कॉलेज सरवडे, राधानगरी, तेजस्विनी संकपाळ -डॉ घाळी कॉलेज, गडहिंग्लज, ऋतुजा रेडेकर-दूधसागर कॉलेज बिद्री, कागल, किशोर पोवार-आजरा महाविद्यालय आजरा, प्रसाद काकडे-छत्रपती शिवाजी ज्युनि. कॉलेज, पन्हाळा, चारूदत्त माळी – एस के पाटील कॉलेज कुरूंदवाड, शिरोळ , विद्या डाकवे – पद्मश्री ग. गो जाधव महाविद्यालय, गगन बावडा, कोमल रेडेकर – डॉ. एन डी पाटील कॉलेज मलकापूर, शाहुवाडी, उत्कर्षा डकरे – कर्मवीर हिरे कॉलेज गारगोटी, भुदरगड , शुभांगी सुतार – आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज कोवाड, चंदगड, दिपाली खाडे – एस बी खाडे कॉलेज कोपार्डे, करवीर, सादीया नायकवडी-सरोजनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर शहर.

‘गोमटेश’ अग्रगण्य शिक्षण संस्था

शिस्त, शिक्षण आणि संस्कारक्षम पिढी घडवणारी शैक्षणिक संस्था अशी ओळख गोमटेश इंग्लिश मेडीयम स्कूलची आहे. प्रशिक्षित शिक्षकवृंद, 850 हून अधिक विद्यार्थी येथे शिक्षणाचा लाभ घेत आहेत. हेरिटेज कोल्हापूर या सारख्या अनेक अभिनव उपक्रमात सातत्याने ही संस्था पुढाकार घेत असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांनी सांगितले.

Back to top button