अजिंक्य रहाणेकडून केडीसीएचे कौतुक | पुढारी

अजिंक्य रहाणेकडून केडीसीएचे कौतुक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शतकी परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या क्रिकेटमधून भविष्यात चांगले खेळाडू घडतील, असा विश्वास व्यक्त करून कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (केडीसीए) कार्य कौतुकास्पद असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य रहाणे याने व्यक्त केले.

खासगी दौर्‍यासाठी कोल्हापुरात आलेल्या क्रिकेटपटू रहाणे याने सहकुटुंब करवीर निवासिनी अंबाबाईदेवीचे दर्शन घेतले. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी जनार्दन यादव व अभिजित भोसले यांनी भेट घेतली. यावेळी सोबत प्राचार्य डॉ. महादेव नरके होते.

यादव व भोसले यांनी कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराज यांच्या काळापासून सुरू असणार्‍या क्रिकेट खेळाच्या परंपरेविषयी माहिती दिली. तसेच कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या 50 वर्षांपासून सुरू असणार्‍या कार्याविषयी सांगितले. महिला व पुरुष क्रिकेटपटू घडवण्यासाठी होणार्‍या स्कील डेव्हलपमेंट कार्यशाळा, विविध प्रशिक्षण शिबिरे यांची माहिती दिली. तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर आयोजित केल्या जाणार्‍या विविध क्रिकेट स्पर्धांबद्दलही सांगितले. यावर रहाणे याने केडीसीएचे क्रिकेटपटू घडवण्याचे काम अत्यंत योग्य पद्धतीने सुरू असून, भविष्यात त्यांना सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.

Back to top button