Kolhapur : पुणे-बंगळूर महामार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; युवक ठार | पुढारी

Kolhapur : पुणे-बंगळूर महामार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; युवक ठार

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची मोटरसायकला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात आज सकाळी ८ च्या सुमारास झाला असून या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे. (Kolhapur)
अपघात मयत झालेल्या तरुणाचे नाव सतिश पांडुरंग गावडे ( वय ४७ रा. कोडोली ता. पन्हाळा ) असे आहे. सतिश गावडे हा औद्योगिक वसाहतीमधील मंत्री मेटॅलिक्स कंपनीत काम करत होता. तो आज सकाळी आपल्या मोटरसायकल क्र. एम एच ०९ बी जी ९७०२ ने कामावर जात असताना पुणेहून बेंगळूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक ( क्र. एम एच ०९ जी जी ११८८ ) ने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूकीची काही काळ कोंडी झाली होती.

हेही वाचा 

Back to top button