कोल्हापूर : विशाळगडावर लष्करी जवानांच्या सलामीने फडकला तिरंगा | पुढारी

कोल्हापूर : विशाळगडावर लष्करी जवानांच्या सलामीने फडकला तिरंगा

विशाळगड; सुभाष पाटील : किल्ले विशाळगडावर लष्करी जवानांच्या उपस्थितीत सलामीने ७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील मुंढा दरवाजा येथे ध्वजारोहण सैन्य दलातील जवानांच्या संचलनात झाले. मंडल अधिकारी संभाजी शिंदे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी नाईक नंदकुमार खराटे यांनी शपथ दिली.

उपसरपंच पुनम जंगम, सामाजिक कार्यकर्ते बंडू भोसले, ग्रा. सदस्य मनोज भोसले, मुख्याध्यापक निलेश कुंभार, सय्यद‌ मुजावर, यासिन मुजावर, दस्तगिर मुजावर, निलेश हर्डीकर, तलाठी घनश्याम स्वामी, राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुभेदार हितेश पार्टे म्हणाले, स्वराज्याच्या उभारणीत या ऐतिहासिक गडकोटांचे योगदान महत्त्वपूर्ण असून येथील ऐतिहासिक वारसा राष्ट्रीय प्रेरणास्थान आहे. येथील भूमातेला वंदन करून तिच्या गौरवार्थ त्यांनी यावेळी अभिमान व्यक्त केला. जिल्ह्यात पाच गडावर तर देशात पंच्याहत्तर गडावर सैन्य दलाच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. कोल्हापूरात विशाळगडसह, पन्हाळा, सामानगड, महिपाल गड, रांगणा या गडांची सैन्य दलाच्या सदर्न कमांडने निवड केली होती. मैत्रेय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमर आडके यांचे नियोजनात योगदान राहीले.

प्रारंभी प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजेंद्र लाड यांनी केले. शिवाजी तरूण मंडळाचे प्रमुख बंडू भोसले व मैत्रेय प्रतिष्ठानचे यशपाल सुतार यांनी मनोगत व्यक्त केलीत. कार्यक्रमास पोलीस पाटील उदय जंगम, निजाम मुजावर, नितेश भोसले, विकास जंगम आदींसह १५० हुन अधिक लोक, मराठा बटालियन बेळगाव येथील १२ जवान व मैत्रेय प्रतिष्ठाण कोल्हापूर संघटनेचे कार्यकर्ते, प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते. दरम्यान ऐतिहासिक मुंढा दरवाजा स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता. आभार प्रणित कदम यांनी मानले.

हेही वाचा : 

Back to top button