औषधांवर क्यूआर कोड बंधनकारक! | पुढारी

औषधांवर क्यूआर कोड बंधनकारक!

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : देशातील सर्वसामान्य रुग्णांचा बनावट आणि दर्जाहीन औषधांच्या सेवनाचा प्रवास संपण्याच्या मार्गावर आला आहे. भारतीय औषध बाजारामध्ये दर्जाहीन आणि बनावट औषधांचा सुळसुळाट रोखण्यासाठी केंद्र सरकारने रुग्णांना दैनंदिन लागणार्‍या महत्त्वाच्या औषधांच्या 300 ब—ँडस्वर आता क्यूआर कोड छापणे बंधनकारक केले आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून (1 ऑगस्ट) सुरू झाली. यामुळे देशात यापुढे 1 ऑगस्टपासून उत्पादित केलेल्या संबंधित औषधांच्या वेस्टनावर क्यूआर कोड छापणे औषध कंपन्यांना बंधनकारक आहे. साहजिकच, बनावट औषधांच्या पायवाटा बंद होणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता डोलो, अ‍ॅलेग्रा, ऑगमँटिन, कॅलपॉल, कोरेक्स, बीकॉसुल्स, बीटॅडिन, फॅबीफ्ल्यू, ग्लुकोनॉर्म, इस्टामेट, मॉन्टेकएल्सी, सॅरिडॉन, शेलकॅल, टीबॅट, थायरोनॉर्म, युनियनझाईन, वोलोनी, झिरोडॉल या मान्यवर ब—ँडस्सह अन्य ब—ँडच्या औषधांच्या वेस्टनावर क्यूआर कोड समाविष्ट केला जाणार आहे. रुग्णांनी या क्यूआर कोडची थोडी सवय करून घेतली, तर बनावट आणि दर्जाहीन औषध सेवन करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.

 

    हेही वाचलंत का ? 

Back to top button