सामान्य माणसाच्या मनात विश्वास निर्माण करा : आ. विनय कोरे | पुढारी

सामान्य माणसाच्या मनात विश्वास निर्माण करा : आ. विनय कोरे

वारणानगर, पुढारी वृत्तसेवा : सध्याचे राजकारण सामान्य माणसाला खटकणारे आहे. भ्रष्टाचार आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याने देशाची प्रतिमा मलिन होत आहे. ती सुधारण्यासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून सामान्य माणसाच्या मनात विश्वास निर्माण करावा, असे आवाहन वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांनी येथे केले.

वारणा समूहाच्या सुराज्य फाऊंडेशनतर्फे आय. ए. एस. परीक्षेतील 17 यशवंतांच्या उपस्थितीत 15 वा गौरव सोहळा शनिवारी दिमाखात झाला. यावेळी ते बोलत होते.

आ. कोरे म्हणाले, देशाची प्रतिमा उंचावण्याची जबाबदारी राजकारणी व प्रशासकीय अधिकार्‍यांची असते. प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले एस. जयशंकर यांनी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर परराष्ट्र धोरण सांभाळत भारताची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला.

सुराज्य फाऊंडेशनचे संचालक प्रा. जीवनकुमार शिंदे यांनी स्वागत करून फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला. ‘सुराज्य’चे अध्यक्ष एन. एच. पाटील म्हणाले, सुराज्य फाऊंडेशनने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात ऊर्जा निर्माण करून त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले.

डॉ. कश्मिरा संखे (ठाणे), वसंत दाभोळकर (दापोली, सिंधुदुर्ग), गौरव कायंदे-पाटील (चांदशी, नाशिक), डॉ. केवल मेहता (बोरीवली, मुंबई), ओंकार गुंडगे (दहिवडी, सातारा), आशिष पाटील (साळशी ता. शाहूवाडी), शशिकांत नरवाडे (तुळजापूर), अमित उंडीरवाडे (समाजवाडी, गोंदिया), प्रतीक कोरडे (भिष्णूर, नागपूर), सिद्धार्थ भांगे (खराडी पुणे), स्वप्निल डोंगरे (नाशिक), डॉ. अतुल ढाकणे (बीड), महारुद्र भोर (अहमदनगर), आदित्य पाटील (नांदेड), डॉ. पूजा खेडकर (औंध, पुणे), दयानंद तेंडोलकर (तेंडोली, सिंधुदुर्ग), निहाल कोरे (टाकळी, सांगली) यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, युवा नेते विश्वेश कोरे, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रताप पाटील कार्यकारी संचालक शहाजी भगत, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, वारणा बझारचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, सरव्यवस्थापक शरद महाजन, वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी वासंती रासम, सुराज्य फाऊंडेशनचे संचालक बी. टी. साळोखे, बी. टी. पायमल, बी. बी. चौगुले आदी उपस्थित होते. प्रा. जीवनकुमार शिंदे व प्रा. नामदेव चोपडे यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button