बिबट्या सद्‍श प्राणी झेपावला आणि ‘त्‍यांना’ दरदरून घाम फुटला! | पुढारी

बिबट्या सद्‍श प्राणी झेपावला आणि 'त्‍यांना' दरदरून घाम फुटला!

राशिवडे ; पुढारी वृत्‍तसेवा :

परिते  ता. करवीर येथील पाटबंधारे विभागाजवळ रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान रस्त्यावरुन बिबट्या सदृश प्राणी झेपावल्याचे दिसून आले. पिग्मी कलेक्शन करुन घरी परतणाऱ्या पिग्मी एजंटने हे दृष्‍य पाहताच त्‍याला दरदरुन घाम फुटला. तो बिबट्या की तरस याबाबत साशंकता असली तरी या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, भोगावती येथील गजानन महाराज पतसंस्थेचे पिग्मी एजंट शिवाजी टेपुगडे हे कुरुकली येथुन पिग्मी कलेक्शन करुन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भोगावतीकडे परतत होते. पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ माळ नावाच्या शेतातून बिबट्या सदृष्य प्राण्याने दोन उड्यातच रस्ता ओलांडला. टेपुगडे यांनी पाहीले, या घटनेची माहिती टेपुगडे यांनी परिते ग्रामस्थांना दिली व सावध केले. त्या दरम्यान कुत्रीही मोठमोठ्याने भुंकत असल्याचा आवाज येत होता.ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत माहिती घेऊन गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला  आहे. सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button