Katrina Kaif and Vicky Kaushal : कॅटरिना-विकीचं डिसेंबरमध्ये लग्न? - पुढारी

Katrina Kaif and Vicky Kaushal : कॅटरिना-विकीचं डिसेंबरमध्ये लग्न?

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. याच दरम्यान कॅटरिना कैफने खुलासा केला आहे की ती आपल्या लग्नाला जवळच्या लोकांना बोलावणार आहे. कॅटरिना सध्या विकी कौशलला डेट करत आहे. एका वृत्तानुसार, यावर्षी डिसेंबरमध्ये दोघे लग्न करण्याची शक्यता आहे. लग्नाच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर कॅटरिनाने प्रतिक्रिया दिली आहे. पण विकीने अद्याप लग्नाबाबत कसलाही खुलासा केलेला नाही.

कॅटरिनाने टायगर ३ च्या मुलाखतीदरम्यान म्हटले होते की, माझ्या लग्नाला सर्वांना आमंत्रण देणार आहे. जेव्हा मी लग्न करेन त्यावेळी संपूर्ण जगाला कळेल. जेव्हा तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेता; तेव्हा तुम्ही सर्व जगाला सांगता की आपण लग्न करत आहोत. ही गोष्ट लपून राहत नाही. लग्न सोहळ्याला आपल्या जवळच्या लोकांना आपण बोलावतो. मला वाटते की माझ्या लग्नाला सर्वांनी यावे. मी एक खासगी व्यक्ती आहे. मी संवेदनशील आणि नाजूक विषयांवर काही बोलत नाही. मी काही विषयांवर बोलणे टाळते. यामुळे मी अहंकारी असल्याचे समजले जाते. मात्र तसे नाही, असे कॅटरिनाने पुढे म्हटले होते.

कॅटरिना २०१९ पासून विकी कौशलला (Katrina Kaif and Vicky Kaushal) डेट करत असल्याचे सांगितले जाते. आता दोघांनी साखरपुडा केला असल्याची माहिती पुढे येत आहे. पण कॅटरिनाच्या टीमने या वृत्तांचे यायाधी खंडन केले होते. माझ्या लग्नाच्या वृत्तांबाबत ज्या काही अफवा पसरत आहेत त्यात तथ्य नसल्याचा दावा कॅटरिनाकडून करण्यात आला होता. विकी आणि कॅटरिना यांच्या अफेयरबाबत सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूरने पहिल्यांदा पुष्टी केली होती.

एका वृत्तानुसार, कॅटरिना तिच्या लग्नात सब्यसाची मुखर्जी याने डिझाईन केलेला लहंगा परिधान करणार आहे. दोघांनी शाही थाटात लग्न करण्याचे नियोजन केले आहे. लग्न सोहळ्यासाठी राजस्थानमधील एक रिसॉर्टची निवड करण्यात आली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोघे विवाहबंधनात अडकणार असून त्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे.

कॅटरिनाचं नाव या अभिनेत्यांशी जोडलं होतं…

याआधी कॅटरिनाचं नाव रणबीर कपूर आणि सलमान खानशी जोडण्यात आलं होतं. पण आता ती विकी कौशलसोबत लग्न करणार आहे. कॅटरिनाने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी आपल्या करियरची सुरुवात मॉडेलिंगने केली. मॉडेलिंग दरम्यान तिने बूम (२००३) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिला ‘सरकार’मध्ये भूमिका मिळाली. खऱ्या अर्थाने तिला ‘मैंने प्‍यार क्‍यों किया’ (२००५) मधून मोठा ब्रेक मिळाला. त्यात तिचा हिरो सलमान खान होता. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये स्थिरावली. त्यानंतर कॅटरिनाने २००६ मध्ये अक्षय कुमार सोबत ‘हमको दीवाना कर गये’ चित्रपटात काम केले. हा चित्रपट हिट ठरला. त्यानंतर तिने नमस्‍ते लंडन, पार्टनर, वेलकम, रेस, अजब प्रेम की गजब कहानी, बॉडीगॉर्ड, एक था टाइगर आदी चित्रपटात काम केले.

हे ही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

Back to top button