अजित पवारांच्या मामेभावाच्या घरावर ईडीचा छापा - पुढारी

अजित पवारांच्या मामेभावाच्या घरावर ईडीचा छापा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापासत्र सुरूच असून, गुरुवारी सकाळी दौंड शुगरचे अध्यक्ष जगदीश कदम यांच्या पुण्यातील निवासस्थानी ईडीच्या पथकाने धडक दिली. पुण्यातील बाणेर परिसरात ही कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी देखील पवार यांच्या भगिनींच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले होते. कदम हे अजित पवारांचे मामेभाऊ असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंडच्या साखर कारखान्यावर ७ ऑक्टोबरला प्राप्तीकर विभागाने छापा टाकला होता. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी पुण्यात ही कारवाई केली आहे.

…म्हणून बिबट्याने अन्नाविना घालवला पाण्यावरच दिवस

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर या खासगी साखर कारखान्यावर आयकर विभागाने ७ ऑक्टोबरला सकाळी सहा वाजता छापेमारी केली होती. सुमारे 14 वर्षांपूर्वी दौंड सहकारी हा दौंड तालुक्यातील आलेगावमधील साखर कारखाना विकत घेत त्याचे खासगीकरण करण्यात आले आहे. अजित पवार यांचे नातलग असलेले नगर जिल्ह्यातील जगदीश कदम कारखान्याचे अध्यक्ष आहेत. माजी आमदार बाळासाहेब जगदाळे यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे व मुंबईतील बडे प्रस्थ असलेले विवेक जाधव हे या कारखान्याचे संचालक आहेत.

Back to top button