अखेर बारामतीचे पाेलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांची उचलबांगडी  - पुढारी

अखेर बारामतीचे पाेलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांची उचलबांगडी 

बारामती ; पुढारी वृत्तसेवा

वादाच्‍या भाेवर्‍यात सापडल्‍याने चर्चेत आलेल्या बारामती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नामदेव शिंदे यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली. रात्री नियंत्रण कक्षाला त्यांची बदली करण्यात आली असून बारामतीची सूत्रे जेजुरीचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्याकडे देण्यात आली आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी रात्री उशीरा  बदल्या केल्या. नोव्हेंबर २०२० मध्ये शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदाची सूत्रे शिंदे यांनी स्वीकारली होती. सुरुवातीपासूनच  ते चर्चेत होते. गेल्या आठवड्यापासून त्यांच्यावर एक बालंट आले होते. जिल्हा पोलिस दलात त्यामुळे खळबळ उडाली होती.

पहा व्हिडिओ : माझ्या नवऱ्याला प्लॅनिंग करून फसवण्याचा प्रयत्न- क्रांती रेडकर

Back to top button