कोल्हापूर: कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखाली | पुढारी

कोल्हापूर: कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखाली

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा : जून महिना कोरडाच गेला, जुलै महिन्यात दमदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण पहिल्या आठवड्यातील चार-पाच दिवस कोरडेच गेले आणि अखेर गुरुवारपासून (दि.६) दमदार पावसाला सुरूवात झाली. पंचगंगा नदीची  १२ फुटांवर असणारी पाणी पातळी आज (दि.७) दुपारी १७ फुटांवर पोहोचली. कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे.

गुरुवारी दुपारीपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास पाणी पातळी १६ फुटांवर होती. पंचगंगा प्रभाव क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे दुपारी राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी १७ फुटांवर गेली. यावर्षी पहिल्यांदाच पंचगंगेचे पाणी राजाराम बंधाऱ्यावरून वाहू लागले आहे. या पाण्यातून दुपारी तीन वाजेपर्यंत वाहतूक सुरू होती.

हेही वाचा 

Back to top button