कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गुरुवारी भूमिका स्पष्ट करणार: समरजितसिंह घाटगे | पुढारी

कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गुरुवारी भूमिका स्पष्ट करणार: समरजितसिंह घाटगे

बिद्री : पुढारी वृत्तसेवा : राज्यात रविवारी घडलेल्या नव्या राजकीय घडामोडींवर कुटुंबातील व्यक्तीशी मी चर्चा करीत होतो. यामुळे मी गेली तीन दिवस जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी भेटलो नाही. संपर्क ही करु शकलो नाही. मी कुणाला भेटू न शकल्यामुळे माझ्याबद्दल अनेक बातम्या आल्या. मी सार्वजनिक काम करीत आहे. त्यामुळे अशा बातम्या येणे सहाजिकच आहे. यात कुणाचा दोष नाही. नव्या घडामोडीबाबत संभ्रम निर्माण होत अनेकजण माझे मत विचारत होते. त्यामुळे माझी भूमिका गुरुवारी (दि. ६) सकाळी कागल येथील कार्यकर्त्याच्या मेळाव्यात स्पष्ट करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज (दि. ५) ‘पुढारी’शी दिली.

नव्या राजकीय घडामोडीबाबत व मुंबई येथील भेटीबाबत काय बोलणे झाले. तसे काहीही बोलणे झालेले नाही. भेटीत काय झाले ते उद्या सविस्तर बोलणार आहे. ते आताच नको, असेही ते म्हणाले. नव्या राजकीय घडामोडीमुळे घाटगे गेली तीन दिवस नॉटरिचेबल झाले होते. कुणाशी संपर्क होवू शकत नव्हता. त्यामुळे कार्यकर्त्यांत कमालीची अस्वस्थता पसरली होती. सोशल मीडियावर उलट- सुलट चर्चा सुरू होती. भाजपपासून फारकत घेणार ? अशा बातम्या पसरल्या होत्या. त्यामुळे कागलच्या राजकारणाचे गेली तीन दिवस चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. मंगळवारी घाटगे यांनी काही मोजक्या कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांची ही भेट घेतली. या भेटीतील नेमकी काय चर्चा झाली? व नव्या राजकीय घडामोडीवर आपली भूमिका स्पष्ट करणार का ? याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा 

Back to top button