डॉ. योगेश जाधव म्हणाले गुणवत्ता, विश्वासाचे नाव बिर्ला सिमेंट | पुढारी

डॉ. योगेश जाधव म्हणाले गुणवत्ता, विश्वासाचे नाव बिर्ला सिमेंट

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गुणवत्ता आणि विश्वासाच्या जोरावर बिर्ला सिमेंटने स्वत:चे स्थान निर्माण केले असून, देशाच्या पायाभूत सुविधा उभारणीत बिर्ला कंपनीने मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन दैनिक ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी केले.

केसोराम इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बिर्ला शक्ती ब्रँड अंतर्गत नव्या काँक्युरिट सिमेंटचे लाँचिंग डॉ. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

देशात मोजक्याच नामवंत सिमेंट कंपन्या असून, यामध्ये बिर्ला शक्तीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, असे सांगून डॉ. योगेश जाधव म्हणाले, या कंपनीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. बदलत्या काळाचा विचार करून कंपनीने गुणवत्तेसाठी कोणतीच तडजोड केली नाही. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस हे नाव उतरले आहे.

आज देश व जगभरात सिमेंटची मागणी वाढत आहे. सध्याची वाढती मागणी ध्यानात घेता सिमेंट उद्योगाला उज्ज्वल भविष्य आहे. 2019 चा विचार केला. तर, भारत हा सिमेंट उत्पादनात दुसर्‍या क्रमांकावरचा देश आहे. यात 98 टक्के उत्पादन हे खासगी कंपन्यांचे आहे. त्यामुळे देश बांधणीत या सिमेंट कंपन्यांचा सिंहाचा वाटा आहे.

आज देशातील बहुतांश रस्ते सिमेंटने बांधले गेले आहेत. देश जोडणीचे काम हे सिमेंट करीत आहे. कोणत्याही देशाची प्रगती ही तेथील पायाभूत सुविधा व रस्त्यांच्या दर्जावरून दिसून येते. कोरोनाची लाट आता ओसरत असून, गृह प्रकल्पांची मागणी वाढत आहे. त्यामुळे सिमेंटची मागणी वाढत जाणार असून, बिर्ला शक्ती ग्राहकांची गरज पूर्ण करेल, असा विश्वास डॉ. जाधव यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास बिर्ला शक्ती सिमेंटचे ऑल इंडिया सेल्स अ‍ॅडव्हायझर प्रकाश पनागंळे, शेडम प्लांटचे हेड यू. व्ही.राजू, बसंतनगरचे प्लांट हेड राजेश गर्ग, चिफ फायनान्शियल कंट्रोलर संजय बक्षी, हेड मार्केट ऑपरेशन आर प्रतिभान, साऊथ विभागाचे सेल्स हेड नागाकुमार, वेस्ट झोनचे हेड मुद्दस्सर शेख, साऊथ महाराष्ट्रचे ट्रेड सेल्स निषाद जोशी, कोल्हापूर सांगलीचे ब्रँच इन्चार्ज जयवंत लोखंडे, कोल्हापूर, सांगली, कोकण विभागाचे सेल्स प्रमोटर नितीन धूत, आर्किटेक्ट असो., इंजिनिअरिंग असोसिएशनचे पदाधिकारी तसेच संजय चव्हाण, सुयश पांगरे, अशोक मुळीक, अनिल भोसले, अनिल पाटील व पश्चिम महाराष्ट्रातील चारशेहून अधिक वितरक सहभागी होते.

Back to top button