हुपरीत शांतीचा संदेश देणारी भव्य रॅली संपन्न | पुढारी

हुपरीत शांतीचा संदेश देणारी भव्य रॅली संपन्न

हुपरी ; पुढारी वृत्तसेवा प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय हुपरीच्या वतीने शांतीचा संदेश देणारी रॅली संपन्न झाली. या रॅलीचे आयोजन भारत सरकार युवा मंत्रालयच्या अंतरराष्ट्रीय अभियान कार्यक्रमाच्या अंतर्गत संपूर्ण भारतात एकच दिवशी आणि एकाचवेळी हा उपक्रम राबवण्यात आला.

आज हुपरी येथे शांतीचा संदेश देणारी  ही रॅली संपन्न झाली. लक्ष्मी देवी गर्ल्स  स्कूलच्या  मैदानावर त्याचे उद्घाटन झाले. त्यामध्ये ब्रह्माकुमारी विदयालय-हुपरीच्या संचालिक सुनिता दिदी, इस्लामपूरच्या संचालिका शोभा दिदी, उद्योजक राजेंद्र शेटे, रोटरीचे अध्यक्ष विशाल बुकटे, पैसाफंड बँकेचे कार्यकरी संचालक शिवराज नाईक, दिपक मिसाठ, गणेश बाईगडे, राहुल इंग्रोळे, डॉ गणेश औंधकर, अमोल गाठ आदि मान्यवर उपस्थित होते.

शांतीचा संदेश देणाऱ्या रॅलीचा समारोप महावीर नगर सूर्या कॉलनी, ब्रहमाकुमारीज़ शिवालयच्या हॉलमध्ये झाला. त्यावेळी या रॅली मध्ये अनेक मंडळे आणि शाळा, कॉलेज होते. सिल्‍व्हर बायेज ग्रुप, रोटरी क्लब रोट्रकट ग्रुप, वीर सेवा दल, 94 ग्रुप,  शिवशक्ती कबड्डी ग्रुप, कुस्ती ग्रुप पट्टन कोडोली यांच्यासह हुपरीतील विविध शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

या रॅली मधील 15 ते 35 वयोगटातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनींना प्रमाणपत्र  देण्यात आले. या वेळी उद्योजक राजेंद्र शेटे यांनी धावपळीच्या युगात स्वतला शांत ठेवणे महत्वाचे असुन, शांतीचा संदेश देणारी ही रॅली महत्वपूर्ण अशीच असल्याचे गौरवोद्गार काढले.  बी के सुनिता दिदी यांनी सहभागी 200 पेक्षा जास्त शांती दूतांचे आभार मानले.  या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन बि के धनश्री बहनजी, वसंत भाई यांनी केले.

हेही वाचा : 

Back to top button