कवठामध्ये आरोग्यदायी गुण : कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास होते मदत | पुढारी

कवठामध्ये आरोग्यदायी गुण : कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास होते मदत

मुंबई : कवठाची बर्फी किंवा चटणी अनेकांनी आवडीने खाल्ली असेल. आंबट-गोड चवीचे हे फळ अनेक औषधी गुणधर्मांनी संपन्न असते. कवठ फळात कार्बोहायड्रेट आणि प्रोटिनचे प्रमाण चांगले असते. हे बीटा कॅरोटिन, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, थायमिन आणि राइबोफ्लेविन या घटकांनी देखील समृद्ध आहे. विशेषतः व्हिटॅमिन ’सी’ चे प्रमाण यामध्ये चांगले असल्याने ते आरोग्यासाठी लाभदायक ठरते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कवठाच्या सेवनाने पचन चांगले राहते. शरीराचे तापमान तसेच कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. तसेच कवठामुळे शरीराला थंडावा मिळतो. कवठाचे सेवन तहान शमवून रक्तविकारापासून मुक्त करते, तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा करते. पोटातील कृमींवरही कवठ गुणकारी ठरते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही कवठाचे सेवन गुणकारी आहे. हृदय रोग आणि डोकेदुखीवरही कवठाचे फळ गुणकारी आहे. कवठामध्ये जास्त प्रमाणात प्रथिने आढळतात ज्यामुळे शरीर ऊर्जावान राहण्यास मदत होते.

हेही वाचा : 

Back to top button