कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत गॅसची पाईप फुटल्याने लाखोंचे नुकसान | पुढारी

कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत गॅसची पाईप फुटल्याने लाखोंचे नुकसान

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीची अंडरग्राऊंड गॅस पाईप जेसीबीने खुदाई करताना फुटल्याने शेकडो किलो गॅस वाया गेल्याची घटना घडली. यात लाखोंचे नुकसान झाले असुन घटनास्थळावरून चालकाने जीसीबीसह पळ काढला. या कंपनीचे काम चालू होते त्याच्यावर एच ओ जी पी कंपनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे संबधीत अधिकाऱ्यांनी सांगितले. पण कारवाई करणार तरी कोणावर एमआयडीसी अधिकाऱ्यांनी आमचे कोणतेच काम चालू नसल्याचे सांगत हात झटकले आहेत.

शिरोली एमआयडीसीमधील मिस्टर हेल्थ या कंपनीशेजारील चौकात आज (दि. २४) एमआयडीसीच्या नळपाणी कनेक्शनचे खुदाईचे काम जीसीबीच्या सहाय्याने सुरू होते. बुधवारी (दि. २४) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एचओजीपी कंपनीची अंडरग्राऊंड गॅस पाईपलाईन फुटल्याने पाईपमधून गॅस प्रेशरने मोठ्या उंच उडत हवेत पसरत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. शिरोली एमआयडीसी मधील अनेक कंपन्याना गॅस लागत असल्याने एचओजीपी कंपनीने अनेक कंपन्यात पाईपद्वारे कनेक्शन दिले आहे. सध्या ही गॅस लाईन सुरू असून या गॅस लाईनवर कंपनीचा एक कर्मचारी २४ तास देखरेखीसाठी उपस्थित असतो. या ठिकाणी नळपाणीचे खुदाई काम चालू होते. यावेळी गॅस पाईपलाईन फोडली अणि कारवाईच्या भितीने जेसीबीसह चालकाने पळ काढला. एमआयडीसीच्या संबंधित काॅन्ट्रॅक्टरला गॅस पाईपलाईनची माहीती दिली.

ज्या परिसरातून ही पाईपलाईन गेली आहे तो परीसर रिकामा असल्याने मोठा अनर्थ टळला. पाईप फुटल्याने गॅस हवेत पसरत असल्याने परिसरात गॅसचा वास पसरला होता. ज्या परिसरातून गॅस पाईप गेली आहे त्या ठिकाणी गॅस कंपनीने आपले फलकही लावले आहेत. जेणेकरून कोणीही खुदाई किंवा अन्य काम करतेवेळी कंपनीस माहिती द्यावी. गॅस पाईपलाईनचा सर्व नकाशा एमआयडीसी ऑफिसमध्ये देण्यात आला असून देखील या ठिकाणी खुदाई करत पाईपलाईन फोडुन कंपनीचे नुकसान केले आहे. त्यामुळे संबंधित खात्यावर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे एचओजीपी कंपनीच्या अधिकाऱ्यानी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

Back to top button