शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू | पुढारी

शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू

हलकर्णी : पुढारी वृत्तसेवा नौकूड (ता. गडहिंग्लज) येथील विष्णू बाळकू चव्हाण (वय ६८) या शेतकर्‍याचा मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास शेतात मृत्यू झाला. चव्हाण हे दिवसभर भर उन्हात शेतात काम करत होते. सायंकाळी शेतातच त्यांना चक्कर आली आणि ते जागीच मयत झाले. दिवसभरात उन्हाच्या झळांनी अत्यवस्थ होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागात वळीव पावसाने हुलकावणी दिली आहे. असे असताना चव्हाण यांना भर उन्हात काम करणे जीवावर बेतल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा

Back to top button