कोल्हापूर : माणगाव येथे संरक्षक कठड्याला धडकून तरुण ठार | पुढारी

कोल्हापूर : माणगाव येथे संरक्षक कठड्याला धडकून तरुण ठार

चंदगड; पुढारी वृत्तसेवा :  चंदगड तालुक्यातील माणगाव येथे ताम—पणी नदीवरील बंधार्‍याच्या संरक्षक कठड्याला दुचाकी धडकून नदीपात्रात पडून गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे येथील अरविंद गणपत गुरव ( वय 30 ) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

गुरव हा सेंट्रीग व बांधकाम कामगार होता. आपल्या नातेवाईकांकडून सांबरे या गावी परत जात असताना हा अपघात झाला असून काल झालेल्या पावसाच्या निसरटीत गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे निदर्शनास येते. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

Back to top button