कोल्हापूर: बांबवडे येथे एसटी बसमध्ये चोरी करणाऱ्या ५ महिलांसह ९ जणांच्या टोळीला अटक | पुढारी

कोल्हापूर: बांबवडे येथे एसटी बसमध्ये चोरी करणाऱ्या ५ महिलांसह ९ जणांच्या टोळीला अटक

बांबवडे; पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाच्या कोल्हापूर – मलकापूर बसमध्ये चोरी करणाऱ्या ५ महिला, ४ पुरुषांना अटक केली. ही कारवाई आज (दि. ८) दुपारी पोलिसांनी बांबवडे स्टॅन्ड येथे केली.

राज्य सरकारने एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना ५० टक्के तिकीट दरामध्ये सवलत दिली आहे. त्यामुळे एसटीमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. महिला चोर या गर्दीचा फायदा घेऊन एसटीमध्ये चढतात व चोरी करून निघून जातात. असाच प्रकार बांबवडे स्टॅन्ड वरती घडला. याची माहिती मिळताच पोलिसांनी बसमधून चोरी करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले.

हेही वाचा 

Back to top button