कोल्हापूर : स्मॅकच्यावतीने जागतिक रक्तदान दिनानिमित्त उद्या रक्तदान शिबीर | पुढारी

कोल्हापूर : स्मॅकच्यावतीने जागतिक रक्तदान दिनानिमित्त उद्या रक्तदान शिबीर

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर(स्मॅक) यांच्या वतीने जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून स्मँक भवन येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. स्मॅकच्या रामप्रताप झंवर हॉलमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडके जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार असल्याची माहिती स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत अधिक माहिती सांगताना ते म्हणाले की शुक्रवार (दि.१४) व शनिवार (दि.१५) या दोन दिवस चालणाऱ्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांना विविध आरोग्य आणि संरक्षण विमा सुविधा देण्यात येणार आहेत. यामध्ये पाच लाखाचा अपघाती विमा, रक्तदाता आणि कुटुंबीयांच्या आरोग्याची तपासणी, आणि पाच लाखाचा आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आरोग्य विमा देण्यात येणार आहे. याबरोबरच मोफत पॅन कार्डही काढून देण्यात येणार आहे

पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष जयदीप चौगुले, खजानीस बदाम पाटील, संचालक संजय भगत, शशिकांत व्होनकळसे, अनिल दटमजगे, पोस्ट खात्याचे वरिष्ठ अधिकारी संतोष के. सिंग, प्रफुल्ल घोडके, प्रमोद मंगसुळे आदी उपस्थित होते.

Back to top button