कोल्हापूर : देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांचे निधन

कोल्हापूर : देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांचे निधन

Published on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांचे शुक्रवारी रात्री अल्पश: आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. शनिवारी (दि. 8) दुपारी 3 वाजता महावीर कॉलेज येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

अ‍ॅड. घोरपडे यांना मंगळवारी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अ‍ॅड. घोरपडे मूळचे कागल तालुक्यातील माद्याळचे. कोल्हापुरात येऊन त्यांनी शिक्षण घेतले. वकील म्हणून काम करताना ते सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभागी झाले. सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाशी ते निष्ठावंत राहिले. माजी पतंप्रधान इंदिरा गांधी यांच्या अटकेनतंर झालेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले.

देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दहा वर्षे काम पाहिले. याच काळात अंबाबाई मंदिरात लावलेला संगमरवर काढण्यात आला. अलीकडेच त्यांची अखील भारतीय काँग्रेसच्या सदस्यपदी निवड झाली होती. रत्नागिरी, सिंधुदुर्गचे काँग्रेस निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, आ. सतेज पाटील यांनी दवाखान्यात जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

logo
Pudhari News
pudhari.news