आज दख्खनच्या राजाचा प्रकट दिन सोहळा | पुढारी

आज दख्खनच्या राजाचा प्रकट दिन सोहळा

जोतिबा डोंगर; पुढारी वृत्तसेवा :  चैत्र महिनातील पहिल्या रविवारमुळे जोतिबा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. पहाटे चार वाजता पाद्यपूजा व काकड आरती सोहळा पार पडला. सकाळी आठ वाजता ‘श्रीं’ना अभिषेक घालून बैठी राजेशाही अलंकारिक महापूजा बांधण्यात आली.

दिवसभरात अनेक सासनकाठ्या वाजत मंदिरात आल्या होत्या. षष्ठी युक्त सप्तमी दिवशी दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा प्रकटदिन सोहळा असल्याने जोतिबा डोंगर येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. जोतिबा चैत्र यात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक जोतिबा डोंगर येथे होणार आहे.

Back to top button