कोल्हापूर : पुरातत्त्व अधिकार्‍यांनी अंबाबाई मूर्तीचा लेप हटवला | पुढारी

कोल्हापूर : पुरातत्त्व अधिकार्‍यांनी अंबाबाई मूर्तीचा लेप हटवला

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी (दि. 14) आलेल्या केंद्रीय पुरातत्त्वच्या अधिकार्‍यांनी देवीच्या चेहर्‍यावरील संवर्धन लेप हटविल्याचा गंभीर आरोप श्रीपूजकांनी बुधवारी केला. तसे प्रतिज्ञापत्र वादी माधव मुनीश्वर यांच्या वतीने अ‍ॅड. नरेंद्र गांधी यांनी न्यायालयात सादर केले. संवर्धनप्रकरणी पुढील सुनावणी 21 मार्च रोजी होणार आहे.

अधिकार्‍यांनी 25 मिनिटे गाभार्‍यात तपासणी केली व छायाचित्रेही घेतली. यावेळी या अधिकार्‍यांपैकी एकाने मूर्तीच्या चेहर्‍यावर 18 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात आलेल्या संवर्धनातील किंवा त्यापूर्वीचा मूर्तीच्या नाकावरील संवर्धनाचा लेप काढल्याचा आरोप श्रीपूजक माधव मुनीश्वर यांनी केला. तपासणीवेळी आपल्यासमोरच हा प्रकार घडल्याचे मुनीश्वर यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा :

करवीरनिवासिनी अंबाबाई देवीची मूर्ती सुस्थितीत; तत्‍काळ संवर्धनाची आवश्यकता नाही, केंद्रीय पुरातत्‍व पथकाचे निरीक्षण

राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 11 टक्क्यांनी वाढ! ‘या’ सरकारचा मोठा निर्णय

Back to top button