गोकुळ दूध खरेदी : म्हशीच्या २ तर गायीच्या दूधात १ रुपयाने वाढ | पुढारी

गोकुळ दूध खरेदी : म्हशीच्या २ तर गायीच्या दूधात १ रुपयाने वाढ

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : गोकुळच्या निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीच् या नेत्यांनी सत्तेवर आल्यानंतर दूध उत्पादक शेतकर्‍यांना लिटरला 2 रुपये वाढ करण्याचे आश् वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता दीड महिन्यातच करण्यात आली.

शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात येणार्‍या म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 2 रुपये तर गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 1 रुपया वाढ करण्यात येत असल्याची घोषणा सत्तारूढ आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

दरम्यान, खरेदी दरात वाढ करत असताना विक्री दरात मात्र कोणतीही वाढ करण् यात येणार नसल्याने ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 11 जुलैपासून करण्यात येणार आहे.

गोकुळवर 71 कोटीचा बोजा पडणार

या निर्णयामुळे गोकुळवर 71 कोटीचा बोजा पडणार आहे. परंतु हा बोजा कोल्हापूर, सांगली व कोकण वगळता अन्य ठिकाणी दूध विक्री दरात वाढ करून कमी करण्यात येणार असल्याचे पाटील व मुश्रीफ यांनी सांगितले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीत आम्ही दूध उत्पादकांना काही आश्वासने दिली होती.

ते म्हणाले की, दूध उत्पादक शेतकर्‍याला लिटरला 2 रुपये वाढ करण्याचा शब्द दिला होता. दूध उत्पादकांनी आमच्यावर विश्वास ठेवत आमच्या हाती सत्ता दिली. त्या विश्वासास पात्र राहून काटकसरीचा कारभार करत आम्ही कोट्यवधी रुपयांची बचत करत आहोत.

उत्पादक शेतकर्‍यांना दूध दरवाढ देण् याबाबतचा निर्णय आम्ही केवळ दीड महिन्यात घेतला. हे करत असताना आम्ही त्याचा एक पैशाचाही बोजा स्थानिक ग्राहकांवर टाकलेला नाही.

गोकुळच् या म्हशीच्या दुधाला मुंबई, पुणे या महानगरात मोठी मागणी आहे. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, संघात आतापर्यंत आम्ही 10 ते 12 कोटींची बचत केली आहे. मुंबई, पुणे याठिकाणी आणखी 20 लाख लिटरची विक्री होऊ शकते.

त्यासाठी म्हशींची संख्या वाढविण्याकरिता राज्य शासानच्या अनेक जातींसाठी असणार्‍या आर्थिक विकास महांमडळ आणि कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेमार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत.

जिल्हा बँकेच्या वतीने म्हैस खरेदीसाठी 500 कोटीपर्यंत कर्ज देण्याचा प्रयत्न आहे. म्हैस खरेदीसाठी दोन लाखापासून 10 लाखापर्यंत पात्रतेनुसार कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांना राज् याबाहेरील जातीवंत म्हैस खरेदीसाठीही कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. याचा दूध उत्पादक शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा.

गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दीड महिन्यात गोकुळच्या वतीने करण्यात आलेल्या बचतीची महिती दिली.

जनावरांच्या लसीकरणासाठी शासनाच्या वतीने लस उपलब्ध करण्यात आल्याने गोकुळची बचत झाली आहे.

पशुखाद्य वाहतुकीची नव्याने निविदा काढली. दूध वाहतुकीच्या मार्गांचे पुनर्नियोजन, टँकर वाहतुकीच्या दरात झालेली कपात, पॅकिंग ठेक्यात केलेला बदल यामुळे गोकुळची आठ ते दहा कोटींची बचत झाली आहे, असेही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेस खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजेश पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. राजूबाबा आवळे, अरुणकुमार डोंगळे, माजी आ. के. पी. पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, ए. वाय. पाटील आदी उपस्थित होते.

गोकुळने दूध खरेदी दरात वाढ केल्यामुळे त्याचा लाभ जिल्ह्यातील साडेचार ते पाच लाख दूध उत्पादक शेतकर्‍यांना होणार आहे.

दूध खरेदी दरात वाढ अशी

तपशील फॅट (एसएनएफ)      सध्याचा खरेदी दर           नवा खरेदी दर

म्हैस              6.0 -9.0            39 रुपये 50 पैसे         41 रुपये 50 पैसे
गाय              3.5 -8.5              26 रुपये                   27 रुपये

 

हे ही वाचलं का ?

अपघात : मुंबई- बंगळूर महामार्गावर भरधाव ट्रकने आठ वाहनांना चिरडले

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : ब्राझील-अर्जेंटिना अंतिम सामन्यात आमने-सामने

हाफिज सईद आहे तरी कोण? ज्याच्यावर 70 कोटींचं बक्षीस लावलंय…

नेपाळी मॉडेल अदिती बुधाथोकीला लाभलंय सौंदर्याचं वरदान

पाहा

Back to top button