पावणेतीन लाखांनी पराभूत झालेल्यांनी विकासकामांवर बोलू नये : सतेज पाटील | पुढारी

पावणेतीन लाखांनी पराभूत झालेल्यांनी विकासकामांवर बोलू नये : सतेज पाटील

उजळाईवाडी, पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्र्यांच्या काळात जलजीवनच्या माध्यमातून जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचे काम केले, त्यामुळे अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पावणेतीन लाखांनी पराभूत झालेल्यांनी विकास कामांवर बोलू नये, असे प्रतिपादन आ. सतेज पाटील यांनी केले. कणेरीवाडी (ता. करवीर) येथे नऊ कोटी 34 लाखांच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते .

आ.पाटील म्हणाले, पालकमंत्री असताना ज्यादा निधी देण्याचे काम केले. आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील गांधीनगर नळ योजनेसाठी मतदार संख्या व भाड्याने राहणारी संख्या याचा विचार करून या योजनेसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केला आहे. गोकुळ, केडीसीसीच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न असतो.

यावेळी खा. संजय मंडलिक, आ. ऋतुराज पाटील यांचे भाषण झाले. प्रास्ताविक शशिकांत खोत यांनी केले. यावेळी चव्हाण बंधूंसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जि.प.सदस्य सरिता खोत, माजी सरपंच शोभा खोत, सरपंच शामल कदम, उपसरपंच सीमा खोत, पोलिस पाटील शिवाजीराव मोरे, प्रकाश खोत, अरुण मोरे आदी उपस्थित होते.

Back to top button