कोल्हापूर : पाडळीच्या जखमी शाळकरी मुलीचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : पाडळीच्या जखमी शाळकरी मुलीचा मृत्यू

पेठवडगाव : चार दिवसांपूर्वी अंबप (ता. हातकणंगले) येथील तलावाजवळ मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झालेली गौरी सचिन जाधव (वय 15, रा. पाडळी) या शाळकरी मुलीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

गौरी जाधव ही अंबप गर्ल्स हायस्कूलमध्ये नववीत शिकत होती. तिने पाडळीहून अंबपकडे जात असलेल्या मोटरसायकलस्वारास लिफ्ट मागितली. गौरीला घेऊन जात असताना अंबप तलावाजवळ अपघात झाला. यामध्ये तिच्या डोक्यास दुखापत झाली होती. कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

Back to top button