कोल्हापूर महापालिकेसमोर 223 कोटी वसुलीचे तीन महिन्यांत टार्गेट | पुढारी

कोल्हापूर महापालिकेसमोर 223 कोटी वसुलीचे तीन महिन्यांत टार्गेट

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  महापालिका प्रशासनाला 2022-23 या आर्थिक वर्षात 515 कोटी महसुली उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्या नऊ महिन्यांत त्यापैकी 292 कोटी वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. एकूण 56.73 टक्के वसुली झाली आहे. येत्या तीन महिन्यांत तब्बल 223 कोटी वसुलीचे टार्गेट प्रशासनासमोर आहे; अन्यथा महापालिकेला कर्मचार्‍यांच्या पगाराच्या रकमेसाठीही अडचणी निर्माण होणार आहेत.

महापालिकेत जमा झालेल्या महसुलात 134 कोटी स्थानिक संस्था करापोटी राज्य शासनाकडून मिळालेल्या अनुदानाचा समावेश आहे. घरफाळ्यातून 46 कोटी मिळाले आहेत. नगररचना विभागाला 39 कोटी कर जमा करण्यात यश आले आहे. रस्ते खोदाईतून महापालिकेच्या तिजोरीत 16 कोटींची भर पडली आहे. इस्टेट विभाग 3 कोटी मिळाले आहेत. पाणी पुरवठा विभागाने सांडपाणी अधिभारातून 5 कोटी 45 लाख, तर पाणीपुरवठ्यातून 25 कोटी 28 लाख रुपये वसूल केले आहेत.

Back to top button