कोल्हापूर : दुचाकींच्या अपघातात 3 तरुण गंभीर | पुढारी

कोल्हापूर : दुचाकींच्या अपघातात 3 तरुण गंभीर

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : नागाव (ता. हातकणंगले) येथील सेवा रस्त्यावर दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले. अतुल गुडाळे, स्वप्नील ऊर्फ संभाजी कांबळे व अविनाश कांबळे अशी त्यांची नावे आहेत.

महामार्ग सेवा मार्गावर नागाव येथील राजेश मार्बल समोर रात्री नऊच्या सुमारास हा अपघात घडला. अतुल गुडाळे हा मोटारसायकलवरून नागाव फाट्याच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी अविनाश कांबळे व स्वप्नील कांबळे हे दोघे मोटारसायकलवरून नागाव येथील डॉ. आंबेडकर नगरमधून शिरोली एमआयडीसीकडे निघाले होते. राजेश मार्बल येथे दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. अतुल गुडाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर अविनाश व स्वप्नील हेही गंभीर जखमी आहेत. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

तिघांनाही उपचारासाठी तातडीने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघाताची माहिती समजताच जखमींच्या नातेवाईक व मित्र मंडळींनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.

Back to top button