कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी'चे संस्थापक-संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक, राजकीय, सहकार, सांस्कृतिक, शैक्षणिक आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सोमवारी त्यांना अभिवादन केले. अभिवादन करण्यासाठी सोमवारी सकाळपासून मान्यवरांनी 'पुढारी भवन'मध्ये हजेरी लावली. 'पुढारी भवन'मधील डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, राजर्षी शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक शिशीर मिरगुंडे यांनी डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आ. ऋतुराज पाटील, माजी आ. मालोजीराजे, के. पी. पाटील, अॅड. धनंजय पठाडे, अॅड. बाबा इंदूलकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अरुण जाधव, मनीषा देसाई, कुलभूषण बिरनाळे, 'आप'चे संदीप देसाई, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, समीर लतिफ, विजय हेगडे, शासकीय कर्मचारी संघटनेचे अनिल लवेकर, वसंत डावरे, संजय क्षीरसागर, बंटी सावंत, शिक्षक नेते दादा लाड, माजी नगरसेवक शेखर घोटणे, ईश्वर परमार, काँग्रेस महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे, जयेश ओसवाल, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, संदीप संकपाळ, संजय पोहाळकर, वाहतूक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, अवधूत पाटील, सतीश जाधव, शंकर उंबराणी, दीपक नोतानी, सौ. वनिता दीक्षित, महापालिका शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, सहायक अभियंता सुरेश पाटील, पद्मल पाटील, माजी उपशहर अभियंता नारायण भोसले, माजी नगरसेवक राहुल माने, राजाराम गायकवाड, रियाज सुभेदार, मोहन सालपे, ईश्वर परमार, मधुकर रामाणे, अश्पाक आजरेकर, शिवानंद बनछोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बँकेचे ज्येष्ठ संचालक एम. एस. पाटील, शशिकांत तिवले, उपाध्यक्ष अजित पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, संचालक विकास कुरणे, रमेश घाटगे, सर्जेराव खोत, किशोर पोवार, अरविंद आयरे, प्रकाश पाटील, सदानंद घाटगे, सौ. हेमा पाटील, श्रीमती मनुजा रेणके, दीपक पाटील, गणपत भलकर, कोल्हापूर बाजार समितीचे संचालक अॅड. प्रकाश देसाई, सचिव जयवंत पाटील, अधिकारी अभिजित सरनाईक, खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, पांडुरंग गवळी, शिवाजी भोसले, साताप्पा कासार, कुमार पाटील, सुटाचे प्रमुख कार्यवाहक प्रा. डी. एन. पाटील आदींनीही अभिवादन केले.