कोल्‍हापूर : गाळात रुतून गव्याचा मृत्यू; पिल्‍लू वाचले | पुढारी

कोल्‍हापूर : गाळात रुतून गव्याचा मृत्यू; पिल्‍लू वाचले

मिणचे खुर्द (कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा : मिणचे बुद्रुक येथील बोंगार्डेवाडी (ता. भुदरगड) येथे रात्रीच्या वेळी रानगवा व त्याचे पिल्लू पाणी पिण्यासाठी जंगला शेजारच्या ‘बामणकी’ नावाच्या शेतात असलेल्‍या खड्ड्यात गेले असता रानगव्याचा पाण्यात पडून मृत्यू झाला.

रात्रीच्या वेळी गाळाचा अंदाज न आल्याने, गवा मादी गाळात रुतत गेली. पहाटेपर्यंत या गव्याला बाहेर पडता आले नाही. मात्र या रानगव्याचे पिलू आईच्या पाठीवर पाय देवून बाहेर आले व तेथेचे घुटमळत राहिले. मानवाचे निसर्गावरील वाढते आक्रमण, बेसुमार वृक्षतोड व वाढत जाणारी रानगव्यांची संख्या यामुळे वन्यप्राण्यांचे अपघात वाढले आहेत. यामुळे पर्यावरण प्रेमीतून चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पंचनामा कूर येथील वनपाल मारुती डवरी, वनरक्षक विनूताई फोंडे यांच्या पथकाने केला.

.हेही वाचा 

दिल्ली महापालिका निवडणूक : बुधवारी मतमोजणी

Nana Patole : लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू : नाना पटोले 

पेंग्विनसारखे सूर मारून शिकार करणारे डायनासोर 

Back to top button