कोल्हापूर : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज कागल दौर्‍यावर | पुढारी

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज कागल दौर्‍यावर

कागल; पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री व भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी ना. ज्योतिरादित्य शिंदे हे शुक्रवार दि. 25 नोव्हेंबर रोजी कागल येथे येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरात भाजपच्या वतीने स्वागत बोर्ड आणि स्वागत कमानी विविध ठिकाणी उभारल्या आहेत.

सकाळी 10 वाजता कागल येथील बस स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ त्यांचे आगमन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून ते खर्डेकर चौकातील श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन मंदिराच्या हॉलमध्ये डॉक्टर, इंजिनिअर्स, वकील, उद्योगपती, व्यापारी व नव मतदार यांच्याशी विविध मुद्द्यांवर संवाद साधणार आहेत. त्यानंतर श्री गैबी देवाचे दर्शन घेऊन गैबी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील. त्यानंतर 11.15 वाजता श्री शाहू हॉल येथे आयोजित केलेल्या बूथप्रमुख, पेजप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांच्या बूथ मेळाव्यास उपस्थित राहतील. दुपारी 12.15 वाजता कारखान्याच्या प्रधान कार्यालयात केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांबरोबर चर्चा करतील.

 

Back to top button