कोल्हापूर : आजची महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द | पुढारी

कोल्हापूर : आजची महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  मुबंईतील रेल्वे मार्गावरील पूल पाडण्यात येणार असल्याने 27 तासांचा मेगा ब्लॉकमुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस शनिवारी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

अनेक प्रवासी स्टेशनवर आल्याने त्यांची तारांबळ उडाली. आज रविवारी (दि. 20) धावणारी मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द झाली आहे. तसेच कोल्हापूर-मुंबई ही कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंत धावणार आहे. रेल्वेने जाणारे प्रवासी ट्रॅव्हल्सकडे वळल्याने ट्रॅव्हल्सचे बुकिंग फुल्ल झाले होते.

Back to top button