कोल्हापुरात आज, उद्या पाणीपुरवठा विस्कळीत | पुढारी

कोल्हापुरात आज, उद्या पाणीपुरवठा विस्कळीत

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर शहरात काही भागांत शुक्रवारी (दि. 18) आणि शनिवारी (दि. 19) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अनेक भागांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. शहरात उंचावर असलेल्या भागांत पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.

पाटबंधारे विभागामार्फत कोगे बंधार्‍याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या बंधार्‍यापुढे पाणी येणार नसल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. महापालिकेकडून पाटबंधारे विभागाशी सातत्याने संपर्क साधून नदीपात्रात पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली आहे. धरणातून सोडलेले पाणी शिंगणापूर बंधार्‍यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार आहे.

सध्या पंचगंगेची पाणी पातळी कमी आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहर व त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागात पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे. तर उंचावरील भागांत पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नदीतील पाण्याची पातळी वाढेपर्यंत हीच परिस्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

Back to top button