कोल्हापूर : देश-परदेशात ‘एमबीबीएस’ करायचे आहे? | पुढारी

कोल्हापूर : देश-परदेशात ‘एमबीबीएस’ करायचे आहे?

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नव्या तंत्रज्ञानामुळे भारतासह परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, रास्त फीमध्ये एमबीबीएस कसे करता येईल, भारतात व परदेशात एमबीबीएस प्रवेश विना डोनेशन, विना मॅनेजमेंट कोटा, मेरिटवरील प्रवेश याबाबत सेमीनार याचे अचूक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी दै. ‘पुढारी’ आणि अस्ट्यूट अ‍ॅकॅडमी यांच्या वतीने भारत व परदेशात एमबीबीएस प्रवेश यासंबंधी सेमीनारचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात अस्ट्युट अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. तुषार देवरस हे मार्गदर्शन करणार आहेत.

वैद्यकीय विद्याशाखेतून पदवी व पदव्युत्तर शिक्षणात स्पर्धा वाढली असून देश-विदेशात शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सेमीनारमध्ये देश आणि परदेशातील वैद्यकीय शिक्षणाबाबतचे समज, गैरसमज, करिअर संधी, सुरक्षितता, परदेशातील अभ्यासपद्धती आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे वैद्यकीय शाखेतील प्रवेशाचे स्वप्न आता सर्वांच्या आवाक्यात असून परदेशातील वैद्यकीय शिक्षणाबाबत सर्वसमावेशक माहिती पालक विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कार्यक्रमात विनामूल्य सहभागी होता येणार असून याचा वैद्यकीय शिक्षण घेऊ, इच्छिणार्‍यांना लाभ घेता येणार आहे.

या बाबींचा समावेश कार्यक्रमात असणार आहे. या अनुषंगाने हा सेमीनार विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. सर्वसमावेशक माहिती या सेमीनारमधून मिळू शकणार असल्याने अवश्य सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच शुक्रवारी (दि. 21 ) हॉटेल सयाजी, कावळा नाका येथे सकाळी 8 ते सायंकाळी 6 च्या दरम्यान डॉ. तुषार देवरस सर विद्यार्थ्यांना मोफत कौन्सिलिंग करणार आहेत.

कार्यक्रमात सहभागासाठी http://kolhapur.AstuteAcademy.com या लिंकवर जाऊन नोंदणी करता येणार आहे. तसेच सत्राच्या 15 मिनिटे आधी कार्यक्रमस्थळी प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर जागा दिली जाईल. अधिक माहितीसाठी कृपया 8530009905, 9766213003 येथे संपर्क साधावा.

सेमीनारमध्ये काय?

* भारत सरकार, खासगी आणि डिम्ड विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया
* 200 + च्या नीट गुणांसह मेरिटवर प्रवेश कसा मिळवायचा
* एमबीबीएस प्रवेशावर नवीन शैक्षणिक धोरण 2020 चा परिणाम
* मेडिकलसाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पर्याय
* नॅशनल मेडिकल कमिशन गॅझेट अधिसूचना विश्लेषण

सेमीनार – दिनांक : गुरुवार दि. 20 ऑक्टोबर.
स्थळ : डॉ. व्ही. टी. पाटील हॉल, ताराराणी विद्यापीठ. वेळ ः सायंकाळी 7 वाजता.

Back to top button