कोल्हापूर : बी.एस्सी. फिजिकल केमिस्ट्री पेपरफुटीप्रकरणी दोघे बडतर्फ | पुढारी

कोल्हापूर : बी.एस्सी. फिजिकल केमिस्ट्री पेपरफुटीप्रकरणी दोघे बडतर्फ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शिवाजी विद्यापीठाचा बी.एस्सी. (सीबीसीएस) भाग-3 चा फिजिकल केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटल्याप्रकरणी संबंधित महाविद्यालयाचा लॅब असिस्टंट व शिपायाला बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच संबंधित महाविद्यालयास एक लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील परीक्षा केंद्रावर हा पेपर फुटला होता.

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा 19 जूनपासून सुरू आहेत. कुंडल येथील एका परीक्षा केंद्रावर 23 जुलै रोजी बी.एस्सी. (सीबीसीएस) भाग-3 सत्र-6 फिजिकल केमिस्ट्रीचा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर व्हायरल झाल्याचे विद्यापीठाच्या भरारी पथकास निदर्शनास आले. भरारी पथकाने तातडीने ही गोष्ट विद्यापीठ प्रशासनास कळविली. त्यानंतर तत्काळ त्या विषयाचा पेपर रद्द करण्यात आला होता.

Back to top button