कोल्हापूर : शिरटी येथील ग्रामपंचायतीच्या सभेत जोरदार खडाजंगी; समर्थकांची हमरीतुमरी | पुढारी

कोल्हापूर : शिरटी येथील ग्रामपंचायतीच्या सभेत जोरदार खडाजंगी; समर्थकांची हमरीतुमरी

शिरटी; पुढारी वृत्तसेवा : शिरटी येथील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांमध्ये दलित वस्तीतील कामांवरून जोरदार खडाजंगी झाली. सदस्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी सुरू झाली. सभागृहात मिटिंग सुरू असताना सदस्यांचा मोठ-मोठ्याने येणारा आवाज ऐकून दोन्ही गटाचे समर्थक आले आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन वादावादी सुरू झाली. मात्र, पोलीस घटनास्थळी हजर झाल्याने वाद आटोक्यात आला.

आज सोमवारी (दि.२५) रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभा सुरू होती. सभेत विरोधी गटाच्या सदस्यांनी आम्ही सुचवलेली दलित वस्तीतील कामे केली जात नसून त्या प्रभागातील सदस्याला विश्वासात न घेता इतर कामे नियमबाह्य होत झाली असल्याचा आरोप केला. यावरून सत्ताधारी विरोधकांत जोरदार जुंपली. दरम्यान मिटिंग सुरू असताना सभागृहाबाहेर असलेल्या काही समर्थकांनी नेत्यांच्या भांडणामुळे आपापसांत वादावादी सुरू केली. आणि यांचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. यावेळी ग्रामपंचायतीसमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, घटनास्थळी पोलीस हजर झाल्यानंतर गावातील प्रमुख पदाधिकारी व पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला.

पोलीस उपनिरीक्षक कुरणे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही सदस्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विरोधी सदस्यांनी होणाऱ्या आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला. दरम्यान सर्व सदस्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना पोलीस उपनिरीक्षक कुरणे यांनी सरपंच व ग्रामसेवकांना केल्या. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त अद्यक्ष,पोलीस पाटील,यासह नागरिक उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button