कुलट वस्तीवर पाझर तलावाचे खोलीकरण; ब्रिटानिया कंपनीकडून 18 लाख रुपयांचा निधी, शेतकर्‍यांना होणार फायदा | पुढारी

कुलट वस्तीवर पाझर तलावाचे खोलीकरण; ब्रिटानिया कंपनीकडून 18 लाख रुपयांचा निधी, शेतकर्‍यांना होणार फायदा

पारनेर : तालुक्यातील बुगडेवाडी कुलटवस्ती येथील पाझर तलाव खोलीकरण काम सुरू असून, या कामी उद्योजक नितीन औटी यांनी पुढाकार घेतला आहे. वाडिया फाउंडेशन सीएसआर ब्रिटानिया कंपनी फंडातून 18 लाख रुपयाचे काम चालू आहे. या कामाचा प्रारंभ माजी उपनगराध्यक्ष दत्ता कुलट, माजी सरपंच अण्णासाहेब औटी यांच्या हस्ते करण्यात आला.

बुगेवाडी परिसरातील दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी पारनेरच्या ब्रिटानिया दूध डेअरीचे केंद्र चालक उद्योजक नितीन औटी यांनी ब्रिटानिया कंपनीकडे या परिसरात जलसंधारणाच्या कामांसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार वाडिया फाउंडेशन सीएसआर फंडातून निधी खर्च करणार असून, त्यामुळे भविष्यात पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी या ठिकाणी अडवले जाऊन, जिरवले जाणार आहे. यामुळे याचा फायदा शेती व जनावरांसाठी होणार आहे, असे नितीन औटी यांनी सांगितले. परिसरातील शेतकरी पावसाच्या पाण्यावर शेतीवर अवलंबून असतात त्यामुळे पाणलोटचे काम केल्यानंतर अनेक भागांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळेच या पाझर तलावाचे खोलीकरण करण्यात आले.

खोलीकरणामुळे पाण्याची पातळी वाढणार असून, यासाठी अनेक शेतकरी पुढे घेणार आहेत. यावेळी वाडिया फाउंडेशनचे अनिल कुमार, कुशला शेट्टी, सुमित धुरंधर यांच्या मार्गर्शनाखाली, ब्रिटानिया कंपनीचे लोंढे, ठेकेदार खामकर, दत्ता कुलट, नितीन औटी, राजेंद्र औटी, हेमंत औटी, ज्ञानेश्वर कुलट, योगेश कुलट, नवनाथ चौधरी, बापू कुलट, रमेश कुलट, ठकाराम चौधरी, किशोर चौधरी, संजय कुलट, बाळासाहेब कुलट, गोरक्ष चौधरी, शुभम कुलट, सचिन वीर, रावसाहेब चत्तर, संदीप बुगे, कैलास चत्तर, तुषार चत्तर, नामदेव चत्तर आदी उपस्थित होते.

पारनेर येथील बुगेवाडी कुलटवस्तीवर पाझर तलावाला अनेक वर्षे झाले होते. त्यामुळे त्याची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. तलावाला गळती होती, त्यामुळे पावसाळ्यात या तलावातून पाणी बाहेर वाहून जाते. त्यामुळे तलावाचे खोलीकरण करण्याचा निश्चय केला. त्यासाठी ब्रिटानिया कंपनीकडून मदत मिळाली, असल्याने परिसरातील शेकडो शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार आहे.
– नितीन औटी, उद्योजक, पारनेर

 

Back to top button