कोल्हापूर : प्लास्टिक पिशव्यांचा विषय एकदा मिटवा! | पुढारी

कोल्हापूर : प्लास्टिक पिशव्यांचा विषय एकदा मिटवा!

कोल्हापूर ; सचिन टिपकुर्ले : 51 मायक्रॉनवरील प्लास्टिक पिशव्यांचा वापर करा, असे शासन सांगते. पण त्या वापरायला महापालिका परवानगी देत नाही. कागदी पिशव्या टिकत नाहीत. शासन व महापालिकेच्या नियमावलीत व्यापारी वैतागले आहेत. नियमांच्या कात्रीत न पकडता प्लास्टिक पिशव्यांचा विषय महापालिकेने एकदा मिटवून टाकावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून हेात आहे.

ग्राहकांना कडधान्य, तेल व अन्य वस्तूंची किरकोळ विक्री करताना त्या प्लास्टिक पिशवीमधूनच दिल्या जातात. पण याच सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आली आहे. या आदेशाची महापालिकेकडून कडक अंमलबजावणी होत असून प्लास्टिक पिशव्या दिसल्यास तत्काळ कारवाई होत आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी दुकानात प्लास्टिक पिशव्या ठेवायचे बंद केले आहे. ग्राहकांनी कडधान्य अथवा अन्य काही वस्तू मागितल्या की, कागदी पिशव्यातून त्या बांधून दिल्या जात आहेत. पण या पिशव्या जास्त भार पेलत नाहीत. त्या लगेच फाटतात.

बाजारात 75 मायक्रॉनच्या पिशव्या आहेत. पण त्यावर उत्पादकाचा शिक्का नाही. त्यामुळे त्या ग्राह्य मानल्या जात नाहीत. या पिशव्या वापरावरही महापालिका कारवाई करत आहे. अजून मागणी प्रमाणे 51 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या पिशव्यांचे उत्पादनच होत नसेल तर मग वस्तू द्यायच्या कशातून, असा प्रश्न व्यापारी वर्गाला पडला आहे.
– संजय शेटे, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स

Back to top button