कोल्हापूर : उदगावमधील ‘त्या’ मुलाचा मृतदेह सापडला, नातेवाईकांचा आक्रोश | पुढारी

कोल्हापूर : उदगावमधील 'त्या' मुलाचा मृतदेह सापडला, नातेवाईकांचा आक्रोश

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा : उदगाव (ता. शिरोळ) येथे साखळे मळा परिसरातील इयत्ता दुसरीमध्ये शिकत असलेला संकेत राजेश बामणे (वय ८) याचा मृतदेह सापडला. एनडीआरएफ टीम आणि आपत्ती व्यवस्थापनाने त्याचा मृतदेह शोधला. गुरुवारी सायंकाळी सातच्या दरम्यान घराजवळील असलेल्या कपडे काढून असल्याचा संशय होता. त्यावरून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तातडीने पथके कार्यान्वित करत मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र शुक्रवारी बारापर्यंत मृतदेह मिळून आल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व एनडीआरएफची पथके पथकाला पाचारण करण्यात आले.

दरम्यान, संकेतचा मृतदेह सापडल्याची घटना समजताच कुटुंबीयांचा हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.

याबाबत अधिक माहिती अशी, संकेत हा गुरुवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास शाळेतून घरी आला होता. आल्यानंतर अभ्यास करत बसला होता. नंतर पावणे सातच्या सुमारास खेळून येतो असे सांगून घरातून बाहेर पडला तो रात्री दहापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केला. तरी त्याचा शोध न लागल्याने जयसिंगपूर पोलीसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह २० कर्मचारी दाखल होऊन शोधाशोध सुरु केली. यावेळी घराजवळ असलेल्या विहिरीच्या काठावर संकेत याचा शर्ट व हाफ पॅंट आढळून आली. त्यावरून जयसिंगपूर पोलिसांनी संकेत पडला असावा असा अंदाज बांधत विविध रेस्क्यू फोर्सनी प्रयत्न केले.

गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता सुरू झालेले शोधकार्य पहाटे पाच वाजता पावसामुळे थांबवण्यात आले. त्यानंतर सकाळी सात वाजल्यानंतर कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची पथक यासह विविध सहा रेस्क्यू फोर्स पथकासहित दाखल झाल्या. यावेळी मृतदेह सापडला. यावेळी तहसीलदार, डॉक्टर अपर्णा उपस्थित होते. ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी या परिसरात केली होती. मृतदेह काढल्यानंतर नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.

यावेळी एनडीआरएफचे असिस्टंट कमांडट प्रवीण दत्त, लोकेश रत्नपारखी, प्रशांत झी, निशांत कुमार, राहुल नौतले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे सुनील कांबळे, राज मोरे, दीपक चव्हाण, सिद्धार्थ पाटील, रोहित जाधव, आयुष्य हेल्पलाईन कुपवाडचे चिंतामणी पवार, अविनाश पवार, सुरेश शेख, यश मोहिते, अमोल व्हतकर बबलू हेरवाडे, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे बाबा पटेल, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button