Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरची सोशल मीडियावर ‘घर वापसी’ | पुढारी

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरची सोशल मीडियावर ‘घर वापसी’

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या पोस्ट्सच्या माध्यमातून ती चाहत्यांशी सतत संवाद साधत असते. तिची लेटेस्ट पोस्ट पहा, यात ती बोलते आहे ‘घरवापसी’बाबत. युजर्सना ही पोस्ट कमालीची आवडते आहे. तर समजून घेऊ या, की श्रद्धाच्या या पोस्टमागे नक्की काय रहस्य आहे. (Shraddha Kapoor)

श्रद्धाने आपला भाऊ सिद्धांत कपूरसाठी ‘कू’वर वाढदिवसाच्या सदिच्छा देताना घरवापसीची एक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच श्रद्धाने आपल्या भावासोबतचा एक खूपच सुंदर फोटोही पोस्ट केलाय. पोस्ट करताना ती लिहिते-
घर वापसी + भैया बर्थडे = हैप्पीनेस 🙃
हैप्पी बर्थडे भैया!!! 💜

या कपूर भाऊ-बहिणीचे एकमेकांसोबतचे नाते अगदी घट्ट आहे. आपल्या या आगळ्या ‘घर वापसी’ला दाखवण्यास त्यांनी ‘कू’वर एकमेकांसोबतचा हा सुरेख पोटो पोस्ट केला.

२०१८ मध्ये आलेला चित्रपट ‘पल्टन’मध्ये दमदार भूमिका करणाऱ्या सिद्धांत कपूरने बुधवारी आपला ३८ वा वाढदिवस साजरा केला. सिद्धांत बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा आहे. सिद्धांतचा जन्म ६ जुलै, १९८४ ला मुंबईमध्ये झाला होता. सिद्धांत आजवर अनेक चित्रपटांमध्ये झळकला आहे.

श्रद्धाचा भाऊ म्हणून स्वत:ला मानतो नशीबवान

सिद्धांत कपूर या गोष्टीमुळे एकदम आनंदी आहे, की त्याची बहिण श्रद्धा कपूर बॉलिवूडमध्ये एकदम छान काम करते आहे. त्याचे म्हणणे आहे, “श्रद्धा कुठल्याही व्यक्तिरेखेला स्वत:मध्ये पुरेपुर भिनवते. मला तिचा भाऊ असल्याचा अभिमान वाटतो.”

पडद्यामागेही केले आहे काम

पडद्यावर दिसण्याआधी त्याने प्रख्यात दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासह दोन वर्षे काम केले आहे. सिद्धांतने ‘भूल भुलैया’, ‘भागम भाग’, ‘चुप चुप के’, ‘ढोल’सोबतच इतर अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक दिग्दर्शकाच्या रुपात प्रियदर्शनसोबत काम केले आहे. पडद्यामागचे बारकावे समजून घेतल्यानंतर त्याने वडील आणि बहिणीच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनयाकडे वळायचे ठरवले.

अनेक चित्रपटांमध्ये केले आहे काम

अभिनेता म्हणून सिद्धांत कपूरने २०१३ मध्ये आपले करियर सुरू केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने ९ ते १० चित्रपटांमध्ये काम केले आहे.

शूट आउट अॅट वडाला: जॉन अब्राहम, अनिल कपूर, कंगना राणावत अशी स्टारकास्ट असलेल्या ‘शूट आउट एट वडाला’ मध्येही सिद्धांत कपूर दिसला होता. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता.

अग्ली: २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘अग्ली’मध्येही सिद्धांत कपूर दिसला होता.

जज़्बा: ऐश्वर्या रायची मुख्य भूमिका असलेल्या ‘जज़्बा’मध्येही सिद्धांत कपूरने सॅम मकलई नावाची भूमिका केली होती.

हसीना पारकर: ‘हसीना पारकर’ या चित्रपटात सिद्धांत कपूर आपली बहिण श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेयर करताना दिसला होता. सिद्धांत कपूरने चित्रपटात डॉन दाउद इब्राहिमची भूमिका केली होती.

पलटन: सत्य घटनेवर आधारित फिल्म ‘पल्टन’मध्येही सिद्धांत कपूरने महत्त्वाची भूमिका केली होती. या सिनेमात गुरमीत चौधरी, अर्जुन रामपाल, सोनू सूद, रोहित रॉय असे कलाकार होते.

हॅलो चार्ली: मागच्या वर्षी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॅलो चार्ली’मध्ये सिद्धांत कपूर इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट एक कॉमेडी ड्रामा होता, जो लोकप्रिय ठरला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

Back to top button