कोल्हापुरात प्रभाग 11 मध्ये सर्वाधिक 18,339 मतदार | पुढारी

कोल्हापुरात प्रभाग 11 मध्ये सर्वाधिक 18,339 मतदार

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने गुरुवारी 31 प्रभागांसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. शहरात प्रभाग क्र. 11 हा सर्वात मोठा प्रभाग ठरला असून, तब्बल 18,339 मतदार आहेत. प्रभाग क्र. 31 मध्ये सर्वात कमी 10,367 मतदारांची संख्या आहे.

सर्वात जास्त पुरुष मतदार प्रभाग क्र. 11 मध्ये 9235, तर प्रभाग क्र. 31 मध्ये सर्वात कमी 5017 आहेत. महिला मतदार प्रभाग क्र. 11 मध्येच सर्वात जास्त म्हणजे 9104 तर सर्वात कमी प्रभाग क्र. 31 मध्ये 5017 इतके आहेत. प्रभाग क्र.28 मध्ये पुरुष-6922 व महिला-6922 एवढे एकसारखे मतदार आहेत.

शहरात गेल्या सहा वर्षांत 8,682 मतदार वाढले आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 5,49,236 आहे. 2015 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदार संख्या 4,53,210 होती. 2022 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदार संख्या 4,61,892 आहे. 8,682 मतदार वाढले आहेत. एकूण पुरुष मतदार 2,32,057, स्त्री मतदार 2,29,817, व इतर 18 मतदार आहेत. 31 मे 2022 पर्यंतच्या मतदारांचा यात समावेश आहे.

महापालिकेची विभागीय कार्यालये, महापालिका मुख्य इमारतीमधील जनसंपर्क कार्यालय, तसेच मुख्य निवडणूक कार्यालय व महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. 1 जुलैपर्यंत सूचना व हरकती दाखल करता येणार आहेत. 9 जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, गुरुवारी एकही हरकत दाखल झाली नाही.

प्रभाग क्र. 1 – 14144 (पुरुष-7196, महिला-6948), प्रभाग क्र. 2 – 16024 (पुरुष-8197, महिला-7826), प्रभाग क्र. 3 – 14190 (पुरुष-7225, महिला-6965), प्रभाग क्र. 4 – 15641 (पुरुष-7826, महिला-7813), प्रभाग क्र.5-12062 (पुरुष-6077, महिला-5985), प्रभाग क्र.6 -12933 (पुरुष-6412, महिला-6521), प्रभाग क्र.7 -13694 (पुरुष-6715 , महिला-6979), प्रभाग क्र.8 -12313 (पुरुष-6216, महिला-6097), प्रभाग क्र.9 -17928 (पुरुष-8912 , महिला-9016), प्रभाग क्र.10 -17962 (पुरुष-9099 , महिला-8863), प्रभाग क्र.11 -18339 (पुरुष-9235, महिला-9104), प्रभाग क्र.12 -17972 (पुरुष-8992 , महिला-8980), प्रभाग क्र.13 -17321 (पुरुष-8625 , महिला-8696), प्रभाग क्र.14 -14369 (पुरुष-7116 , महिला-7252), प्रभाग क्र. 15-13639 (पुरुष-7052 , महिला-6585), प्रभाग क्र.16 -12456 (पुरुष-6171 , महिला-6284), प्रभाग क्र.17 -13444 (पुरुष-6664 , महिला-6779), प्रभाग क्र.18 -15869 (पुरुष-7686 , महिला-8181), प्रभाग क्र.19 -16276 (पुरुष-8251 , महिला-8025), प्रभाग क्र.20 -16049 (पुरुष-7950 , महिला-8098), प्रभाग क्र. 21-14394 (पुरुष-7107 , महिला-7286), प्रभाग क्र.22 -14119 (पुरुष- 7051, महिला-7066), प्रभाग क्र.23 -17030 (पुरुष-8526 , महिला-8503), प्रभाग क्र.24 -16020 (पुरुष-8166 , महिला-7854), प्रभाग क्र. 25- 17345 (पुरुष-8884 , महिला-8461), प्रभाग क्र.26 -13711 (पुरुष-7020 , महिला-6691), प्रभाग क्र.27 -14978 (पुरुष-7505 , महिला-7472), प्रभाग क्र.28 -13844 (पुरुष-6922 , महिला-6922), प्रभाग क्र.29 -14109 (पुरुष-7233, महिला-6876), प्रभाग क्र.30 – 13350 (पुरुष-6677, महिला-6672), प्रभाग क्र.31 -10367 (पुरुष-5349, महिला-5017).

Back to top button