Independence day कोल्हापूर : मटनाचं काय सांगता, ३ टन जिलेबी फस्त! | पुढारी

Independence day कोल्हापूर : मटनाचं काय सांगता, ३ टन जिलेबी फस्त!

पुढारी ऑनलाईन डेस्क :  स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला कोल्हापूर जिल्ह्यात जिलेबी विक्रीची प्रथा गेली अनेक वर्षं आहे. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ३ टन जिलेबी विक्री झाल्याचे सांगण्यात आलं.

मागील रविवारी कोल्हापुरात मोठ्या जल्लोषात गटारी साजरी साजरी केली. गटारीनिमित्त कोल्हापुरात तब्बल टनात मटणाची आणि चिकणची विक्री झाल्याचे समोर आले. कोल्हापूरकरांना मटनासाठी फक्त निमित्त लागतं. मटणाचा बेत करण्यासाठी कोणत्याही गोष्टीचे कोल्हापूरकर निमीत्त शाेधतात; पण कोल्हापूरकर गोड खाण्यातही पुढे आहेत. स्वातंत्र्य दिन आणि प्राजसत्ताक दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात जिलेबी विक्रीची प्रथा अनेक वर्षांपासून आहे.

आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ३ टनांपेक्षा जास्त जिलेबीची विक्री झाल्याचे समोर आले आहे.

कोल्हापूर शहरात १ टनाच्यावर जिलेबीची विक्री झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनामुळे स्वातंत्र्य दिन साधेपणात साजरा करण्यात आला; परंतू जिलेबी विकत घेण्‍यात कोल्हापूरकरांनी कोणातीही कचुराई केली नाही.

कोल्हापूर शहरातील राजारामपुरी, शाहुपूरी, महापालिका चौक, बिंदु चौक, गंगावेश तालीम यासह मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात जिलेबीचे स्टॉल लागले होते. याचबरोबर महिला बचत गटांनीही मोठ्या प्रमाणात जिलेबी स्टॉल उभारत मोठी कमाई केली आहे.

जिलेबी
जिलेबी

तुपातील आणि साध्या जिलेबीला मोठी पसंती

याबाबत माधुरी बेकरीचे मालक वडगांवकर म्‍हणाले, आम्ही तुपातील आणि साधी जिलेबी तयार करताे. कोरोनामुळे जिलेबी विक्री कमी होईल अशी आम्हाला शंका होती; परंतू कोल्हापुरकर कोणत्याही गोष्टीला भरभरून प्रतिसाद देतात. यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही जिलेबी विक्री मोठ्य प्रमाणात झाली आहे.

कोल्हापूरातील जिलेबी विक्रेते माळकर यांनी सांगितले की, आमच्याकडे रोज जिलेबीची विक्री होत असते.

परंतू स्वांतत्र्यदिनाला आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही जिलेबी राेजच्‍या मागणीपेक्षा तिप्पटीने तयार करत असतो.मात्र कोरोनामुळे जिलेबीचा मोठा खप कमी झाला आहे. शाळा आणि उद्योग क्षेत्रातील लोक जिलेबीसाठी मोठ्या ऑर्डर द्यायचे; परंतु यंदा आम्हाला त्याचा मोठा फटका बसला आहे.आजच्या एका दिवसात आमच्याकडे ५०० किलो जिलेबीची विक्री होते.

पर्शियन साम्रज्यातून जिलेबी भारतात कशी आली?

माेगल  सम्राटांसह आलेल्‍या व्यापार्‍यांबरोबर भारतात जिलेबीचे आगमन झाले.

जिलेबीचा भारतातला प्रवास जसा विस्तारला तशीच ही पाककला जगभरात पसरत गेली.

सीरिया, इराण, टय़ुनिशिया, तुर्कस्थान, ग्रीस, सायप्रस, इजिप्त, येमन, मोरोक्को अशा देशांमध्येही तिने आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे.

व्यापाऱ्यांमुळे भारतात जिलेबीचे आगमन

जिलेबी हा खाद्‍यपदार्थ खंरतर भारतीय नाही.

पर्शियन साम्राज्यातील तेराव्या शतकात तुर्कीच्या मोहम्मद बीन हसन बगदादी यांनी किताब अल तबीक नावचं पुस्तक लिहलं.

यामध्ये खाण्यापिण्याचे लज्जदार वर्णन करण्यात आलं आहे. यामध्ये झलेबिया म्हणजेच जिलेबीचा उल्लेख आढळतो.

हेही वाचलं का ? 

हे ही पाहा : 

Back to top button